जळगाव शहरात अवैध शस्त्रे बाळगून फिरणाऱ्या एका टोळीचा शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत चार संशयीत आरोपींना गेंदालाल मिल परिसरातून गुरुवारी 11 सप्टेंबर रोजी पहाटे 5 वाजता अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून गावठी बनावटीची दोन पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि एक कार असा १ लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी सायंकाळी 6 वाजता पत्रकार परिषदेत दिली आहे.