खामगाव शहरातील जनुना तलावावर नव्याने उभारण्यात आलेल्या विसर्जन घाटाचे लोकार्पण राज्याचे कामगार मंत्री व अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना. आकाश फुंडकर यांच्या हस्ते ५ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता लोकार्पण करण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गणेशोत्सव, नवरात्रोत्सव व जगदंबा विसर्जनासाठी जनुना तलावावर भक्तांना थेट काठावरून विसर्जन करावे लागत होते. त्यामुळे अडचणी व सुरक्षिततेचा धोका वाढत होता. या पार्श्वभूमीवर एक कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आला.