जन सुरक्षा कायदा रद्द करण्यात यावा यासाठी आज 10 सप्टेंबर रोजी महाविकास आघाडी कडून राज्यभरात निदर्शने करण्यात येत आहेत, त्याच अनुषंगाने बुलढाणा येथील जयस्तंभ चौकात दुपारी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी कडून जोरदार निदर्शने करण्यात आली. जन सुरक्षा कायदा रद्द करण्यात यावा या मागणीसह राज्य व केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.