माजलगाव तालुक्यातील सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या अवकाळी आणि जोरदार पावसामुळे पुरुषोत्तम पुरी हे गाव महापुराच्या पाण्याने पूर्णतः वेढले गेले असून, गावाचा बाहेरील संपर्क तुटला आहे. पूरपरिस्थितीमुळे रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. गावातील नागरिकांना अन्न, पाणी, औषधं अशा आवश्यक गोष्टींचा तुटवडा जाणवू लागला आहे.नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे शेतजमिनी पाण्याखाली गेल्या असून पिकांचेही प्रचंड नुकसान झाले आहे.