औंढा नागनाथ तालुक्यातील वगरवाडी तांडा येथील बंजारा समाज बांधवांकडून शेकडो वर्षापासून वगरवाडी येथील नॅशनल ढाब्याजवळ असलेल्या वाघाई मातेस भोग लावून मंदिरास बैलांच्या प्रदक्षिणा मारण्यात येतात दरम्यान हीच शेकडो वर्षाची परंपरा जपत पोळा सणाच्या करनिमित्त दिनांक 23 ऑगस्ट शनिवार रोजी सकाळी 11 वाजता वाघाईमातेस भोग चढवून मंदिरास बैलांसह प्रदक्षिणा मारण्यात आल्या यावेळी महिलांनी पारंपारिक पद्धतीने बंजारा नृत्य सादर केले यावेळी महिला पुरुष यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती