श्री हनुमान देवस्थान ट्रस्ट, राजुरा तसेच बैलपोळा व तान्हापोळा उत्सव समितीच्या वतीने तान्हा पोळा उत्सव मोठ्या उत्साहात आज दि 23 आगस्ट ला 5 वाजता साजरा करण्यात आला. या पारंपरिक उत्सवात चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांनी विशेष उपस्थिती लावून बालगोपालांनी साकारलेल्या कलात्मक रचना, आकर्षक सजावटींचे निरीक्षण केले.याचवेळी बक्षीस वितरण करण्यात आले.