उल्हासनगर रेल्वे स्थानकामध्ये एक पोलीस कर्मचाऱ्याला झोप लागली म्हणून त्या ठिकाणी एका व्यक्तीने व्हिडिओ काढत शिव्या दिल्या आणि तो शिव्या दिलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. मात्र या व्हायरल व्हिडिओ नंतर अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या असून इंस्टाग्राम वर व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या तरुणावर कारवाईची मागणी केली जात आहे. तसेच हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे.