27 ऑगस्ट रोजी राजारामपुरीत गणेश आगमन मिरवणुकी दरम्यान ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी 32 गणेश मंडळ आणि डॉल्बी मालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी आज दिनांक 28 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजून वीस मिनिटांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे दरम्यान यामध्ये शिवशक्ती मित्र मंडळ न्यू गणेश मित्र मंडळ जय शिवराय मित्र मंडळ यांच्यासह 32 गणेश मंडळ आणि डॉल्बी मालकांचा समावेश आहे.