परंपरेनुसार सिंधू फ्रेंड्स ग्रुप गोंदियाने सिंधी शाळेच्या मैदानात पर्यावरण पूरक कृत्रिम तलाव पाण्याची टाकी तयार करून गणेशमूर्ती विसर्जनाचे आयोजन केले. ज्यामध्ये 806 भाविकांनी कृत्रिम तलावात गणेश मूर्तीचे विसर्जन केले. गेल्या वर्षी 650 मूर्तीचे विसर्जन करण्यात आले होते तर यावर्षी ही संख्या 800 पेक्षा जास्त झाली आहे हे उल्लेखनीय आहे या उपक्रमातून प्रेरित होऊन आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्येही अशाच प्रकारचे कार्यक्रम सुरू होत आहेत.