सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने मोठी कारवाई करत कोरोली ब्रिज परिसरातून १७ किलो ५६७ ग्रॅम गांजा जप्त केला असून ओडिशा राज्यातील दोन आरोपींना अटक केली आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे ३ लाख ७३ हजार रुपये एवढी आहे. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना सोलापूर जिल्ह्यातून गांजा पुरवठा होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेला कारवाईचे आदेश देण्यात आले. त्यानुसार पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या पथकाने कोरोली ब्रिज परिसरात सापळा रचला.