बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी पुण्यातील तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशाल शिवाजी वाबळे (वय २५), गौरव किरण रणधीर (वय २६) व साहिल अशोक लोंढे (वय २३) अशी त्यांची नावे आहेत. ही कारवाई पहाटे विलवडे येथे बांदा पोलिसांकडून करण्यात आली, अशी माहिती बांदा पोलीस ठाण्यातून शनिवार 13 सप्टेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता देण्यात आली.