महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा रस्त्यावर गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास रस्त्यावरून चाललेल्या दुचाकीवर माकड झडप घालून बसल्याने भीषण अपघात झाला. या घटनेत पतीचा मृत्यू झाला असून पत्नी गंभीर जखमी झाली आहे. त्यामुळे तापोळा खोऱ्यात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत पुरुष ठाण्यातून गुरुवारी दुपारी दीड वाजता मिळालेल्या माहितीनुसार आनंद सखाराम जाधव वय ५०, रा. देवळी, ता. महाबळेश्वर हे पत्नीसमवेत महाबळेश्वरहून देवळीकडे दुचाकीवरून जात होते. चिखली परिसरातील तापोळा रस्त्यावर अपघात झाला.