Download Now Banner

This browser does not support the video element.

परभणी: रेल्वे स्टेशनवर वंदे भारत एक्स्प्रेसचे जिल्हावासियांनी केले जंगी स्वागत

Parbhani, Parbhani | Aug 26, 2025
परभणी रेल्वे स्टेशनवर आज मंगळवार 26 ऑगस्ट रोजी दुपारी 12 22 वाजता नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ कार्यक्रम उत्साहात पार पडला. या सोहळ्याला परभणीकर नागरिकांसह भारतीय जनता पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी वंदे भारत एक्सप्रेस ही परभणी जिल्ह्यासाठी एक मोठी सुविधा ठरेल, अशी भावना व्यक्त केली. आधुनिक सोयी-सुविधांनी सुसज्ज असलेली ही गाडी प्रवाशांना वेगवान, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव देणार आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us