शासनाने सातारा जिल्हा परिषद निवडणूक विभाग व ११ पंचायत समिती निर्वाचक गणाची अंतिम प्रभाग रचना दि.२२ ऑगस्ट २०२५ रोजी शासन राजपत्रात प्रसिध्द करण्याबाबत आदेशीत केले आहे. त्यानुसार गुरुवारी प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. महसूल उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांनी गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता याबाबतची माहिती दिलेली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-२०२५ च्या अनुशंगाने प्रभागाच्या भौगोलिक सिमा निश्चित करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला होता.