अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यात पिंपळखुटा गावामध्ये वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत आहे ज्यामुळे गावकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागतोय. याबाबत अकोला महावितरण ग्रामीण कार्यकारी अभियंता गौरखनाथ सपकाळे यांनी येणाऱ्या काही काळातच गावातील समस्या दूर करून नियमित विद्युत पुरवठा केला जाणार असल्याचे ग्वाही दिली आहे.