पालघर जिल्ह्यातील सातपाटी, शिरगाव येथे समुद्रातून वाहून आलेले तीन कंटेनर आढळून आले आहेत. या कंटेनरमध्ये ऑइल सदृश्य पदार्थ असल्याचे निदर्शनास आल्याने तेली खून समुद्री जीवास धोका निर्माण होऊ नये यासाठी भरती- ओहोटीच्या अंदाजानुसार क्रेनच्या सहाय्याने पोलीस प्रशासन व इतर विभागांच्या मदतीने हे कंटेनर हटवण्याचे काम सुरू आहे. तीन पैकी एक कंटेनर सुरक्षितरित्या समुद्रकिनाऱ्यावर हलवण्यात आला आहे.