आज दिनांक 4 सप्टेंबरला नुकत्याच प्राप्त झालेल्या माहितीनुसार मोर्शी शहरातील जयस्तंभ चौकातील एक व गांधी मार्केट मधील तीन दुकाने फोडून मुद्देमाल लंपास केल्याची घटना दिनांक ३ सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता वगळतीस आली आहे. स्थानिक दुकानदारांनी घटनेची तक्रार मोर्शी पोलीस स्टेशनला दाखल केली असून, दाखल तक्रारीवरून मोर्शी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासात घेतला आहे