मेळघाटातील दिया येथे १० मेगा वॅट चा सोलर प्लांट तयार करण्यात येणार आहे. या सोलर प्लांट ला दिया येथील ग्रामस्थांनी आज सकाळी ११:३० वाजता विशेष ग्रामसभा बोलवून ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला.या ग्रामसभेत उपस्थित शेकडो महिला पुरुषांनी सोलर प्लांट नहीं चलेगा अशा घोषणा दिल्या. तसेच या सोलर प्लांट साठी गरीब शेतकऱ्यांच्या जमिनीवर कंपनीचा डोळा असून त्या जमिनी बळकावण्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे हा प्लांट गावात होवू देणार नाही असा पवित्रा ग्रामसभेत घेण्यात आला