पुलावरून पाणी वाहत असताना दुचाकी टाकू नका अशा सूचना वारंवार प्रशासन देते मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्या जाते. 18 तारखेला जोरदार झालेल्या पावसाने चांदनी ते बोथली नाल्यावरील ठेंगण्या पुलावरून पाणी वाहत असताना दिनांक 18 ला सायंकाळी या पुलावरून पुराच्या पाण्यात दुचाकी तिघांनी टाकली ती घसरली त्यामुळे तिघेही पुराच्या पाण्यात वाहत गेले. दोघे झाडाच्या मुळाला पकडून ठेवल्याने वाचले परंतु एक वाहत गेला दिनांक 20 तारखेला दुपारी 12 वाजता उमरी तलाव येथे मृतक रवींद्र गोंधळी यांचा मृतदेह आढळून आला...