वेण्णा लेक मधील वीस वर्षापासून काम करणाऱ्या ५३ बोटमन कामगारांचे किमान वेतन चालू करावे याबाबतचे निवेदन कुशल भास्करराव बोधे सातारा जि. सरचटणीस भाजपा कामगार मोर्चा संघटनेच्या वतीने महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषद अकाउंटंट सचिन कदम यांना निवेदन देण्यात आले आहे.महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषदेअंतर्गत कार्यरत बोटमन कम मजूर गेल्या अनेक वर्षांपासून अन्यायग्रस्त आहेत. सन २०११ पासून आकृतीबंध अस्तित्वात नाही तसेच नवीन भरतीही थांबलेली आहे.