पुणे – येरवडा येथील वाहतूक विभागाच्या कार्यालयात वाहनचालकांकडून दंड कमी करून घेण्यासाठी आज मोठी रांग लागली होती. सकाळपासूनच नागरिकांनी कार्यालयाबाहेर गर्दी केली. काही ठिकाणी वाहनचालकांची एकमेकांशी धुसफूस झाल्याचेही दिसून आले. वाहनचालकांवर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ई-चलनाच्या माध्यमातून दंडाची रक्कम थकलेली आहे. ही थकबाकी सवलतीच्या दरात भरता येणार असल्याची माहिती मिळताच मोठ्या संख्येने लोक येरवड्यातील वाहतूक शाखेकड