: सागरी सुरक्षा दल आणि मच्छिमार बांधव यांच्यातील एकोपा आणि खेळाडूवृत्ती वाढविण्यासाठी रायगड जिल्हा पोलीस प्रशासनाकडून “सागरी सुरक्षा दल चषक २०२५” कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उदघाटन रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक आंचल दलाल यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पोलीस बांधव, सागरी सुरक्षा दलाचे सदस्य, मच्छिमार आणि स्थानिक नागरिक उपस्तीत होते.