भंडारा तालुक्यातील कवडसी गावात झडत्या म्हणत बैलपोळा सण मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे सकाळ पासून बळीराजा आपल्या जिवलग मित्र बैलाला सजविन्यात व्यस्त होता. त्यानंतर 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता दरम्यान कवडसी येथे सर्व शेतकऱ्यांनी बैलांची सजावट करून आपापल्या बैल जोड्या तोरणात आणल्या होत्या. यावेळी बैलपोळ्यामध्ये सहभागी बैल जोड्यांना जिल्हा परिषद सदस्य तथा माजी सभापती जिल्हा परिषद भंडारा प्रेम भाऊ वनवे यांच्या वतीने पिण्याच्या पाण्याचे कॅन देण्यात आले.