भंडारा जिल्ह्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसात निलागोंदी येथे गौरीशंकर केवळराम वंजारी यांचे अनिवासी जीर्ण घराची भिंत लगतच्या टेकचंद सिताराम वंजारी (वय ४२,रा.निलागोंदी, ता.लाखनी) यांच्या अंगणात व गुरांच्या गोठ्यावर पडली. या घटनेत अल्पभूधारक शेतकरी टेकचंद वंजारी यांची एक गाय, 2 शेळ्या व 2 कोंबड्या मलब्यात दबून जागीच ठार झाल्या. तर टेकचंद यांची पत्नी वैशाली वंजारी या गंभीर जखमी झाल्या.