तुमसर तालुक्यातील नवरगाव येथे दि. 11 ऑगस्ट रोज सोमवारला दुपारी 3 वा.च्या सुमारास तुमसर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी मुकेश गायधने याच्या हातभट्टीच्या दारू अड्ड्यावर धाड घालून आरोपीच्या ताब्यातील 800 किलो मोहफास सडवा, 30 किलो गरम मोहफास सडवा तसेच दारू गाळप करण्याचे साहित्य असा एकूण 1 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आरोपी विरुद्ध तुमसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.