महाराष्ट्र सरकारने मांडलेल्या विशेष जनसुरक्षा विधेयकाला उबाठा गटाने तीव्र विरोध दर्शविला आहे.या विधेयकामुळे सामान्य नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर गदा येणार असल्याचा आरोप करत आज दुपारी ४ वाजता उबाठा गटाने दर्यापूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.या वेळी युवासेना जिल्हाप्रमुख अंकुश पाटील कावडकर यांच्या नेतृत्वाखाली दर्यापूर उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात हे विधेयक तात्काळ रद्द करावे, नागरिकांच्या हक्कांचे रक्षण करावे आणि लोकशाहीला बाधा आणणारे कायदे थांबवावेत.