मराठा आरक्षणाच्या मागण्यांमधील आठ पैकी सहा मागण्या महाराष्ट्र सरकारने मान्य केल्यानंतर आता ओबीसी समाजाने याला जोरदार विरोध दर्शविला आहे. राज्य सरकारचा निर्णय हा ओबीसी समाजावर अन्यायकारक असल्याचा आरोप करण्यात आला असून सरकारने काढलेला जीआर तात्काळ रद्द करावा, अशी मागणी ओबीसी समाजाने केली आहे.या मागण्यांसाठी आज अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर ओबीसी च्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने ओबीसी बांधव उपस्थित होते. संतप्त ओबीसी बांधवांनी महाराष्ट्र सरकारचा निषेध केला