भाजपाचे बीड तालुकाध्यक्ष मनोज पाटील यांच्या पिंपळनेर येथील निवासस्थानी दगडफेक करत गाड्यांची तोडफोड करून दहशत माजवत योगिराज विनोद नरवडे याने थेट मनोज पाटील यांचे वडील सतीश पाटील यांच्यावर हल्ला करण्याच्या हेतुने धावत गेला. त्यावेळी उपस्थित लोकांनी गर्दी केल्याने तो हल्ला टळला. मात्र योगीराज याने घरामधून कपाटातील नगदी 90 हजार रुपयांसह सहा तोळे सोन्याचे गंठण जबरदस्तीने चोरून नेले. याप्रकरणी पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.