२ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एनएचएम कर्मचाऱ्यांनी थाळी वाजवत शासनाविरोधात तीव्र निषेध नोंदविला. १५ दिवसांपासून सुरू असलेल्या संपाला धार देत आमच्या मागण्या ऐका, अन्यथा आरोग्य सेवेला धोका निर्माण होईल,असा इशारा देत कर्मचाऱ्यांनी शासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला.व या नोटीसबाबत संघटनेचे शिष्टमंडळ बैठक घेऊन पुढील दिशा ठरवणार असल्याचे सांगण्यात आले.