उद्घाटनाआधीच प्रशासकीय इमारतीचे बांधकाम उघड बाळापूर येथील पारस फाटा येथे बांधलेली नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत उद्घाटनाआधीच समोरील काँक्रीट कोसळल्याने वादात सापडली आहे. ठेकेदाराने हलक्या दर्जाचे साहित्य, राखयुक्त सिमेंट आणि कमी लोखंडाचा वापर केल्याचा आरोप होत आहे. या घटनेमुळे जनतेत नाराजी पसरली असून मोठ्या गैरप्रकाराची शंका व्यक्त होत आहे. संबंधित ठेकेदारावर कारवाई व्हावी व संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष केंद्रित के