मोपेड दुचाकीवर देशी दारू घेऊन येणाऱ्या 2 जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांचेकडून 1 लाख 9 हजार 810 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गौरव दिक्षीत याला ताब्यात घेण्यात आले. तर सचिन वर्जे हा पसार झाला. ही कारवाई ता. 20 बुधवारला रात्री 8 वाजता हमदापुर-कांढळी मार्गावर सिंदी रेल्वे पोलिसांनी केली. याप्रकरणी दोन्ही आरोपितांवर दारूबंदी कायद्यान्वये रात्री 10.30 वा. गुन्हा नोंद करण्यात आला. अशी माहिती ता. 21 ला सिंदी पोलिसांकडून प्राप्त झाली.