शेगांव–पंढरपूर महामार्गावर भरधाव कार उलटली; एकजण जखमी 29 ऑगस्ट दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहिती वरून शेगांव–पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गावर वडगाव सरहद्द फाट्यावरील पुलाजवळ भरधाव वेगात असलेली स्विफ्ट डिझायर MH-01 BK 7757) कार खड्ड्यात उलटली. या अपघातात कारमधील जालना येथे कार्यरत लघु पाटबंधारे उपविभागीय अधिकारी आर व्ही शेळके हे जखमी झाले आहे. अपघातानंतर संबंधितांना तळणी येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.