बागलाणच्या करंजाड येथील ई-सेवा केंद्र जळून खाक, लाखो रुपयांची हानी, कागदपत्रे जळून खाक Anc: करंजाड येथील शिवराय कॅम्पुटर अँड महा-ई-सेवा केंद्र हे तब्बल चार ते पाच वर्षापासून करंजाड, भुयाने,पिंगळवाडे , विजयनगर ,जाखोड, नरकोळ, निताने इत्यादी गावांसाठी उपयुक्त व महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी अगदी सोयीचे केंद्र आहे. याच ई सेवा केंद्राचे संचालक हर्षल गिरीधर भामरे हे सुद्धा नित्याने परिसरातील नागरिकांना सेवा देत आहेत. अगदी अल्प दरात सेवा देत आहेत.