Vaijapur, Chhatrapati Sambhajinagar | Aug 27, 2025
पाय घसरून विहिरीत पडल्याने एका 43 वर्षीय शेतकऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास तालुक्यातील शिरसगाव शिवारात घडली.रामदास मच्छिंद्र कुटे वय 43 वर्षे राहणार शिरसगाव असे घटनेतील मयत शेतकऱ्याचे नाव आहे.या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार रामदास हे नेहे वस्ती जवळील आपल्या शेतात काम करत असताना सकाळी 11 वाजेच्या सुमारास पाय घसरून ते विहिरीत पडले.