भाजपचे नवी मुंबईतील आमदार तथा वनमंत्री गणेश नाईक यांच्या विरोधात बेलापूर ग्रामस्थ आक्रमक झाले. वनमंत्री गणेश नाईक यांनी बेलापूर जेट्टी जवळ स्वतःच्या खाजगी बोटी लावल्यामुळे ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागत आहे असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. आम्हाला न्याय द्यायचा सोडून आमच्यावर अन्याय करत आहेत अशी संतप्त प्रतिक्रिया देत गणेश नाईक यांच्या विरोधात आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे. भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्यासमोरच गणेश नाईक यांच्या विरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले होते.