अहिल्यानगर मराठा आरक्षण समिती अध्यक्ष विखेंवर बाळासाहेब थोरात यांचा निशाणा ; जबाबदारी असूनही गावोगावी भांडण लावत फिरत आहेत मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकारने स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी अप्रत्यक्ष टीका केली आहे. विखे पाटील यांच्यावर आरक्षणा संदर्भातील जबाबदारी सोपवण्यात आली असतानाही ते अहिल्यानगर जिल्ह्यात गावोगावी भांडण लावत फिरत असल्याचा आरोप थोरात यांनी केला.