जयसिंगपूर येथील ल.क.अकिवाटे इंडस्ट्रियल इस्टेटमधील टेक्नॉव्हिजन कंपनीच्या मागील भागात आज सोमवार दिनांक २५ ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.या आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.सुरुवातीच्या काही वेळात आग नियंत्रणात आणण्यासाठी कोणताही प्रयत्न दिसून आला नाही.मात्र नागरिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे अग्निशामक दलाच्या तीन गाड्या काही वेळात घटनास्थळी दाखल झाल्या असून जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे