भंडारा तालुक्यातील दवडीपार बाजार येथे अवैधरित्या दारू विक्री होत असल्याची गोपनीय माहिती कारधा पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी दिनांक २८ ऑगस्ट रोजी अवैध दारू विक्री अड्ड्यावर धाड घातली असता आरोपी शैलेश भांडारकर वय ३५ वर्षे रा. दवडीपार बाजार याच्या ताब्यातून १ लिटर मोहफुलाची हातभट्टी दारू किंमत २ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने सदर आरोपीवर कारधा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास कारधा पोलीस करीत आहेत.