माढा तालुक्यातील सीना नदीला पूर आला आहे. सीना कोळेगाव धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सीना नदीत सोडण्यात आलं आहे. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी उंदरगाव, दारफळ सीना, निमगाव येथे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना सरसकट पंचनामे करून तत्काळ मदत उपलब्ध करून देण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत.