आज २२ ऑगस्ट शुक्रवार रोजी रात्री सव्वा आठ वाजता मिळाली माहितीनुसार अमरावतीच्या मोर्शी तालुक्यातील राजुरवाडी आणि निंभारणी परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आलेल्या पुराने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पिकांचे पंचनामे आणि नुकसान भरपाई मिळण्यास होणाऱ्या विलंबाबद्दल शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर होता. या पार्श्वभूमीवर आज खासदार बळवंत वानखडे आणि माजी आमदार यशोमती ठाकूर यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करून प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली.