बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून गणेशोत्सवानिमित्त मुंबई व मुंबई परिसरातील चाकरमान्यांना आपल्या गावी जाता यावे यासाठी कोकण रेल्वे मार्गावर मोफत मोदी एक्सप्रेस आज शनिवार २३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता दादर येथून कोकणच्या दिशेने रवाना झाली आहे.