शहराच्या मध्यवर्ती भागातील महत्त्वाचा राजकमल चौक, जयस्तंभ चौक ते रेल्वे स्टेशनदरम्यानचा उड्डाणपूल पूर्णतः नादुरुस्त झाल्याने तो आज दिनांक २४ ऑगस्ट २०२५ रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून सर्व प्रकारच्या वाहनधारकांसह पादचाऱ्यांसाठी संपूर्णपणे बंद करण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या सूचनेनंतर हा निर्णय घेण्यात आला असून, नागरिकांनी तात्काळ पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलिस आयुक्तालयाने केले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच या उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणात तडे दिसू ल