साक्री तालुक्यातील छडवेल पखरून येथील शेतकरी ईश्वर मोरे (वय ४२) यांच्या मालकीच्या पत्र्याच्या शेडमधून काल अज्ञात चोरट्यांनी १६ हजार रूपये किमतीच्या १७ शेळ्या व ६ हजार रूपये किमतीचे ४ बोकड असा एकूण २२ हजार रूपये किमतीचे पशुधन चोरून नेले आहे.याप्रकरणी ईश्वर मोरे यांनी बुधवारी १० सप्टेंबर रोजी दुपारी ४.४ मि दिलेल्या तक्रारीवरून साक्री पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ. उमेश चव्हाण करत आहेत.