मागील दोन दिवसापासून किनवट तालुक्यात झालेल्या जोरदार व ढगफुटी सदृश्य पावसामुळे इस्लापूर परिसरातील जनजीवन झाले होते, कुपट्टी फाटा जवळील पूल हा पूर्णत: पुराच्या पाण्याच्या प्रवाहात खचल्याने कुपट्टी ते नंदगाव मार्ग वाहन धारकांसाठी मोठी डोकेदुखी बनली आहे, या पुलावरील सिमेंट काँक्रीटचा मोठा भाग वाहून गेल्यामुळे वाहन चालकांना तसेच प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे, सदरील पुलाची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी या मार्गावरून ये जा करणाऱ्या वाहनधारकांमधून होत आहे.