भुदरगड तालुक्यातील आकुर्डे जिल्हा परिषद मतदार संघ तसेच विविध गावांमध्ये खासदार धनंजय महाडिक यांच्या फंडातून ७ कोटी ८० लाख रुपयांची सोलर हायमॅक्स पथदिवे योजना मंजूर करण्यात आली आहे. अशी माहिती भाजप तालुका अध्यक्ष देवराज बारदेशकर यांनी आज सोमवार, २१ जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजता आयोजित पत्रकार परिषदेत दिली.