केळीवेळी येथील रहिवासी असलेले भूमिपत्र सौनिक अमोल सेवकरामजी नळे हे आपली सेवा पूर्ण करून नुकतेच सेवानिवृत झाले.त्यांच्या या देश सेवेचा गौरव व्हावा या भावनेतून केळीवेळी येथील ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी खासदार अनुप धोत्रे, भाजपा जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकार, राजेश नागमते, मधुकर पाटकर, मुकुंदराव बकाल, किशोर बुले, पुरुषोत्तम नळे, आदी मान्यवर उपस्थित होते.