राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समायोजनाच्या मागणीसाठी सोमवारी दुपारी जळगाव शहरातून मोर्चा काढण्यात आला. गेल्या १३ दिवसांपासून सुरू असलेल्या राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू असून याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी १ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता जळगाव जिल्हा परिषद ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निदर्शने करत मोर्चा काढण्यात आला. कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांची पूर्तता न झाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.