ऐतिहासिक पार्श्वभूमीवर असलेला पिंपळनेर येथील श्री सद्गुरू समर्थ खंडोजी महाराजांचा १९७ वा श्री नामसप्ताह व यात्रोत्सव सुरू आहे. उद्या ३० ऑगस्टला महाराजांची १९७ वी पुण्यतिथी आहे. सप्ताहात दररोज सकाळी पाचला भुपाळ्या-काकडआरती, आठ वाजता गीतापाठ, दुपारी चार ते पाच व्याख्यान, सायंकाळी पाचला महिलांचे भजन, सहा वाजता हरिपाठ, रात्री आठ ते नऊ वाजता पंचपदी भजन, रात्री नऊला आरती आणि साडेनऊ ते साडेअकरादरम्यान कीर्तन होत आहे.