या प्रकरणात २४ वर्षीय तरुणी 'एमबीए'चे शिक्षण घेत असून ती बाणेर येथील खासगी कंपनीत प्रशिक्षण घेत आहे. कंपनीत प्रवेश करत असताना आरोपीने 'डिलिव्हरी बॉय'चा वेश परिधान करून तिला अडवलं. तोंडाला मास्क घालून आलेल्या आरोपीने बोलण्याचा प्रयत्न केला. तरुणीने नकार दिल्यानंतर त्याने पिस्तुलातून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला, परंतु शस्त्रातून गोळी सुटली नाही. यानंतर तरुणीने बाणेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. यानंतर गुन्हे शाखेच्या ४ च्या पथकाने आरोपीला अटक केली