चोपडा शहरात रथ गल्ली आहे. या रथ गल्लीत गोल मंदिर जवळ एका धर्माची मिरवणूक जात होती. तेव्हा मिरवणुकीत सहभागी एकावर गॅलरी मधून उमेश गोसावी यांनी गुलाल टाकला. तर संग्राम परदेशी व मोनू उर्फ आदित्य माळी याने सदर इसमाला सांगितले की तुम्ही काय वाकडे केले. असे बोलून दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा या तिघांनी प्रयत्न केला. तेव्हा तिघांविरुद्ध चोपडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.